श्रीनगर – जम्मू काश्मीरच्या अनंतनागमधील बिजबेहरा येथे गस्त घालणाऱ्या सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात शुक्रवारी (ता.२६) एक सीआरपीएफ जवान शहीद झाला. या हल्ल्यात एका मुलाचाही मृत्यूही झाला. या हल्ल्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.
ज्या भागात हल्ला झाला तो संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. दरम्यान, घटनास्थळी शोधमोहीम सुरु आहे.दरम्यान, आज त्रालमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. सुरक्षा दलाने सुरु केलेल्या सर्च ऑपरेशन दरम्यान ही कारवाई करण्यात आली. येथे कालपासून चकमक सुरु आहे. रात्री ऑपरेशन थांबवल्यानंतर आज सकाळी पुन्हा सुरक्षा दलाने दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरु केली.







