सुशांतचा शेवटचा चित्रपट रिलीज होणार

मुंबई – प्रसिध्द अभिनेता सुशांत सिंह राजपुतने आत्महत्या केल्याने त्याचे फॅन्स नाराज झाले आहेत. सुशांतचा ‘दिल बेचारा’ हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. पण त्या अगोदरच सुशांतने आत्महत्या केली. ‘दिल बेचारा’ हा चित्रपट त्याच्या आयुष्यातील शेवटचा चित्रपट ठरला. तो पाहण्यासाठी उत्सुकता लागली आहे. यापूर्वी एक बातमी आली होती की, हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल. आता या चित्रपटाविषयी मोठी बातमी समोर आली आहे की २४ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. डिजने प्लस, हॉटस्टारवर रिलीज होईल. सुशांतचा शेवटचा चित्रपट सर्व सब्स्क्रायबर्स आणि नॉन-सब्स्क्रायबर्सना पाहायला उपलब्ध असेल.”प्रेम, आशा आणि अंतहीन आठवणींची गोष्ट. २४ जुलैला ‘दिल बेचरा’ तुमच्यात असेल. हा चित्रपट सब्स्क्रायबर्स आणि नॉन सब्स्क्रायबर्स सर्व पाहतील. अशी माहिती डिज्ने प्लसने दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here