संसदरत्न खासदार मा.डॉ.अमोल कोल्हे यांनी संसदेत मांडलेले मुद्दे खुप महत्वाचे – आमदार अशोक बापु पवार

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – कोविड19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशातील आरोग्यव्यवस्था अतिशय मेहनत घेत आहे.आतापर्यंत सुमारे शंभर डॉक्टर कोरोनाचे बळी ठरले आहेत. आरोग्ययंत्रणेवर प्रचंड ताण असल्याचे स्पष्ट दिसत आहे.या पार्श्वभूमीवर हा ताण दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. आणि कोरोनावरील लस उपलब्ध होईपर्यंत कुशल मनुष्यबळाची गरज भासणार आहे.
याबाबत काही सुचना असणारे निवेदन केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धनजी यांना दिले. या निवेदनात मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता डॉक्टर्स व परिचारिका यांच्यासाठी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या सहकार्याने कोविड-आयसीयू मॅनेजमेंट साठी शॉर्ट टर्म कोर्स सुरु करावा,अशी मागणी केली.याशिवाय राष्ट्रीय आरोग्य मोहिमेअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या मनुष्यबळाचे मानधन वाढवावे.यांसह खासगी रुग्णालयांना काही प्रोत्साहनात्मक पॅकेज द्यावे अशा मागण्या केल्या. डॉ. हर्षवर्धन यांनी वेळात वेळ काढून हे निवेदन समजून घेतले व स्वीकारले याबद्दल त्यांचे मनापासून आभार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here