मुंबई प्रतिनिधी (प्राजक्ता अरूण चव्हाण) – महाराष्ट्र – कर्नाटक सीमेवर वसलेले तांबाळा या गावात जिल्हा परिषदेची पहिली ते चौथी पर्यंतची शाळा असून १९४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मुख्याध्यापक दयानंद मठपती, सह शिक्षक संतोष वाघमारे, श्रीमंत संगनाळे, लक्ष्मण चापाले, दामोधर मोहारे, उत्तम वाळवे व नामदेव चोले यांच्या प्रयत्नातून शाळेत अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले जातात.
शिक्षकांच्या या प्रयत्नाला ग्राम पंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, युवक व शिक्षण प्रेमी नागरिक नेहमीच प्रोत्साहन देत असतात. या गावाच्या लोकसहभामुळे आजपर्यंत शाळेत पाच लाख रुपयांच्या वस्तू जमा झाल्या आहेत. याचा खूप फायदा विद्यार्थ्यांना होत आहे.
तांबाळा शाळेचे काम पाहून व कोरोना काळातसुध्दा मुलांचे शिक्षण चालू राहावे यासाठी मुंबई येथील दानशूर व्यक्ती लक्ष्मीचंदजी केनिया यांनी मुलांसाठी दोन ३२ इंची अँड्राँईड टी. व्ही. भेट दिली आहे. या कार्यास मुंबई येथील आशायें फाउंडेशनचे खूप सहकार्य लाभले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लक्ष्मण ब्रम्हावाले, उपाध्यक्ष अमृत तुमकुटे, सदस्य नागेश बोकछडे यांनी या टी. व्ही. स्वीकारल्या. तसेच तांबाळा शाळेचे मुख्याध्यापक मठपती यांनी लक्ष्मीचंदजी केनिया व आशायें फाउंडेशनचे आशाबी शेख यांचे आभार मानले.







