महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे सत्यशोधक दिवस उत्साहात साजरा

धरणगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – दि. २४ सप्टेंबर २०२० गुरुवार रोजी स्थानीय महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे सत्यशोधक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
भारतातील थोर समाज सुधारक – राष्ट्रपिता – महात्मा ज्योतिराव फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि बहुजन समाजाला शिक्षण – समता स्वातंत्र्य – बंधुता – न्याय देण्याचे काम केलं सत्यशोधक समाज निर्माण करून बहुजनांना गुलामगिरीतून मुक्त केले. सर्वप्रथम सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले व विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक हेमंत माळी , व्ही.टी. माळी , एस.एन. कोळी , पी.डी.पाटील , अशोक पाटील , बहुजन क्रांती मोर्चा चे तालुका संयोजक आबासाहेब राजेंद्र वाघ , छत्रपती क्रांती सेना चे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील , प्रोटान शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष सुनील देशमुख , भारत मुक्ती मोर्चा चे तालुका अध्यक्ष गौतम गजरे तसेच शाळेतील सर्व शिक्षक बंधू-भगिनी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here