धरणगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा धरणगाव तालुका शेतकरी कृती समितीची मागणी

धरणगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – मागील काही दिवसांपासून सततच्या अति पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे ज्वारी मका सोयाबीन कापूस व बाजरी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे व सर्व पिके जमीनदोस्त झालेले आहे तरी शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 ते 30 हजार मदत मिळावी व पिक विमा कंपन्यांना व शासनाच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ पंचनामे करावे व धरणगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा इत्यादी मागण्या धरणगांव तहसीलदार नितीन देवरे यांच्या कडे करण्यात आल्या.
याप्रसंगी शेतकरी कृती समितीच्या मागण्यांना धरणगाव तालुका भाजपा धरणगाव तालुका काँग्रेस कमिटी धरणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस इत्यादींनी पाठिंबा दिला याप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते ज्ञानेश्वर महाजन, दिनेश भदाणे, शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष गोपाल पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, शिरीष बयस, अँड वसंतराव भोलाने, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रतिलाल चौधरी, उपाध्यक्ष चंदन पाटील, गोकुळ पाटील चिंचपूरा, अनिल पाटील पिंपळेसिम, युवक अध्यक्ष गौरव चव्हाण, उपाध्यक्ष राहुल मराठे, प्रमोद जगताप, कैलास पाटील आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here