सावदा (अजीत तडवी बादशहा) – ज्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील व्यक्ती स्त्री/पुरुष मरण पावल्यास त्यांना राष्ट्रीय कुटुंब योजने अंतर्गत 20 हजार रुपये लाभ देण्यात येतो. यासाठी पहिले मृत्यू दिनांकापासून 1 वर्षा पर्यंत अर्ज करण्याची अट होती. परंतु शासनाने आता 1 वर्षा ऐवजी 3 वर्ष अर्ज भरण्याची मुदत दिली आहे. तरी सर्व दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना कळविण्यात येते की दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील व्यक्ती दुर्देवाने मृत्य पावल्यास त्यांनी या योजनेतील अर्ज सादर करण्यासाठी दिलेल्या मुदतवाढीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेवक राजेशभाऊ वानखेडे आणि नगरसेवक फिरोज खान पठाण यांनी केले आहे.
Home राज्य उत्तर महाराष्ट्र राष्ट्रीय कुटुंब योजनेतील अर्जासाठी मुदतवाढीचा लाभ घ्यावा – राजेशभाऊ वानखेडे







