शिवशंभू संघटना शेतकरी आघाडीची मागणी; तहसीलदारांना दिले मागणीचे निवेदन
राहाता (विशेष प्रतिनिधी) – राज्यभर अतिवृष्टी होत असल्यामुळे शेतमालाचे खुप नुकसान झाले आहे. त्यामधून शेतीसाठी केलेल्या मेहनतीचे पैसे सुद्धा त्याला मिळणार नाही ही आजची वास्तव परिस्थिती आहे. 15 दिवसापूर्वी प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले.पण त्यानंतर सुद्धा मुसळधार पाऊस सुरूच आहे त्यामुळे पंचनामे झाले तेंव्हा पेक्षा आजची परिस्थिती खुप गंभीर आहे.
महाराष्ट्र राज्याचा विचार करता सरासरी 70% पिकाचे नुकसान झाले आहे. शासनाकडून मिळणारी तोकडी आर्थिक मदत त्याला अद्याप मिळाली नाही.हवालदिल परिस्थितीमध्ये रब्बीच्या पेरणीसाठी त्याच्याकडे आर्थिक भांडवल उपलब्ध नाही.अशा नैसर्गिक संकट काळात प्रशासनाकडून शेतकऱ्याला विना विलंब त्वरित एकरी 25 हजार रुपये आर्थिक मदत डायरेक्ट शेतकऱ्याच्या बँक अकॉउंढ वर देण्यात यावी.तसेच राज्यभर सुरू असलेले दूध भाववाढ प्रकरण लक्षात घेता दयाला प्रति लिटर 30 रुपये भाव शेतकऱ्याला देण्यात यावा. अशी शिवशंभु शेतकरी आघाडीची रास्त मागणी आहे. येत्या 10 दिवसात प्रशासनाकडून मागणीची पूर्तता करण्यात यावी अन्यथा शिवशंभु शेतकरी आघाडी संघटनेकडून 03 ऑक्टोबर 2020 रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालय आणि जिल्हा स्तरावरील जिल्हाधिकारी कार्यालय येथे एक दिवसीय उपोषण करण्यात येईल. उपोषण काळात झालेल्या मानसिक आणि आर्थिक नुकसानीस आणि असुविधेस सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील.
तरी या संकटसमयी प्रशासनाने भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कष्ठकरी,श्रमकरी, शेतकरी वर्गाला आर्थिक मदतीचा हात देण्यात यावा, अशी मागणीही शिवशंभू शेतकरी आघाडीकडून करण्यात आली आहे.







