जळगाव जिल्ह्यात आज आढळले ४४३ कोरोनाबाधित;
८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू
जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील प्रशासन, आरोग्य व्यवस्था, सामाजिक संस्था आणि नागरिकांच्या समन्वयाने कोरोनाबाधितांच्या संख्येला अटकाव होत असून, आज (दि.२४) ७८३ कोरोनाबाधितांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. दरम्यान आज कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ४४३ कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
जिल्ह्यात दिवसभरात आढळलेल्या ४४३ कोरोनाबाधितांमध्ये जळगाव शहरात सर्वाधित ११४ कोरोनाबाधित तर जळगाव ग्रामिण – ६, भुसावळ-५३, अमळनेर-४१, चोपडा-४३, पाचोरा-१४, भडगाव-१०, धरणगाव-७, यावल-२५, एरंडोल-१२, जामनेर-१९, रावेर-३३, पारोळा-११, चाळीसगाव-३८, मुक्ताईनगर-४, बोदवड-१२ आणि इतर जिल्ह्यांमधील १ असा समावेश आहे.
दरम्यान, आज ७८३ कोरोनाबाधितांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून, कोरोनावर मात करण्याऱ्यांची एकूण संख्या ३५ हजार ९६१ इतकी झाली आहे. मात्र आज ८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा ११३७ वर गेला आहे. सद्यपरिस्थितीत ८ हजार ७७४ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु असल्याची जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.







