चाळीसगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील घोडेगाव येथील नाथबाबा मंदिराच्या उत्तरेकडील माती बंधारा पूर्ण क्षमतेने पाण्याने भरला असून बंधाऱ्यावरुन पाणी वाहत आहे, पाण्याचा अति दाबाने मातीने बनविलेल्या बंधारा फुटल्यास त्या खालील बंधारे देखिल फुटुन परीसरातील शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने शासनाने मातीने बनविलेल्या बंधाऱ्याची उंची वाढविण्यात यावी अशी मागणी रयत शेतकरी सेनेच्या वतीने दि २४ रोजी चाळीसगाव तहसीलदार यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे .
मुसळधार पाऊसाने घोडेगाव शिवारात हाहाकार माजविला असल्याने सर्व बंधारे भरून नदी नाल्याना पुर आला आहे . पाऊस बंद होण्याचे कुटलेही चिन्ह दिसत नाही. मात्र अति पाऊसाने घोडेगाव परीसरातील संपूर्ण बंधारे भरून वाहत आहेत . नाथबाबा मंदिराच्या उत्तरेकडील माती बंधारा पूर्ण क्षमतेने पाण्याने भरला असून बंधाऱ्यावरुन पाणी वाहत आहे, पाण्याचा अति दाबाने मातीने बनविलेल्या बंधारा फुटल्यास शासनाने पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना राबवून पाणी अडवून शेतकऱ्यांना शेती ला पुरेसे पाणी उपलब्ध केलेल्या योजनाचा लाभ पुढील काळात मिळणार नाही .म्हणून खालील बंधारे वाचविण्यासाठी नाथबाबाच्या उत्तरेकडील बंधाऱ्याची उंची वाढविण्यात यावी अशी मागणी रयत शेतकरी सेनेच्या वतीने दि २४ रोजी चाळीसगाव तहसीलदार अमोल मोरे यांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनावर रयत शेतकरी सेनेचे जिल्हाउपाध्यक्ष किरण पवार, ,तालुका उपाध्यक्ष विलास मराठे,भरत नवले, छोटु आहिरे अबादास जाधव,भाऊलाल आगोणे,बबन जाणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.







