खासदार उन्मेश पाटील यांच्या संकल्पनेतून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त चाळीसगाव तालुक्यातील देव माणसांचा सत्कार संपन्न
चाळीसगाव (प्रतिनिधी) – मोदी फॉर पिएम ऑर्गनायझेशन यांच्या संकल्पनेतून चाळीसगाव तालुक्यातील कोरोना महामारी मध्ये रात्रंदिवस जनतेची सेवा करणाऱ्या देव माणसांचा सत्कार करण्याचे आयोजन तालुकाध्यक्ष गणेश पाटील व तालुका उपाध्यक्ष सर्वेश पिंगळे यांच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी चाळीसगावचे तहसीलदार साहेब व पी.आय. ठाकूरवाड, पंचायत समितीचे बी.डी.ओ. पवार, डॉ. राहुल वाघ यांचा सत्कार करण्यात आला आहे. यावेळी चाळीसगाव पंचायत समितीचे उपसभापती भाऊसाहेब पाटील, अनिल चव्हाण, बबडी शेख, ज्ञानेश्वर साबळे, कैलास गावडे, सागर मुंडे, शुभम घोडे, अक्की राजपूत, दर्शन अहिरे यांच्यासह सर्व मोदी फॉर पिएम संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







