सद्भावना संघाच्यावतीने कोविड – १९ निमित्त जागृत नागरिक चिंतन वेबिनारचे आयोजन

मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरूण चव्हाण) – देशात कोरोना महामारी थैमान घालत आहे. मुंबईत २१ मार्च २०२० पासून लॉकडाऊन लावला गेला आहे. मानवीय जीवन वाचवायचे असेल तर सोशल डिस्टंसिंग ठेवणे अनिवार्य झाले आहे. देशभरात व देशा बाहेर सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांची संवाद प्रक्रिया सुरू झाली. याचाच एक भाग म्हणून सद्भावना संघानी वेगवेगळ्या विषयांवर वेबिनार घेण्याची प्रक्रिया सुरू केली.
मुंबईत वास्तव्य करणारे आणि लालकृष्ण अडवाणी यांचे माजी सचिव ज्येष्ठ पत्रकार, लेखक सुधींद्र कुलकर्णी यांचे वर्तमानपत्रातील भारत – चीन संबंधावरील लेख असो की, हिरोशिमा, नागासाकी अणू हल्ल्याला होणारी ७५ वर्ष असो असे अनेक लेख आले. यावर चिंतन होणे, चर्चा होणे गरजेचे होते. देशाची भावी पिढी, नागरिक याबद्दल काय विचार करतात. मानवता, सद्भावना म्हणून आपण काय विचार, कृती करू शकतो. यासाठी या वेबिनारचे आयोजन सद्भावना संघाने केले होते. सद्भावना संघाच्या वर्ष विद्या विलास यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून सद्भावना संघासोबत पूरक होऊन काय करता येईल. याबद्दल मांडणी करावी असे सुचविले.
सुधींद्र कुलकर्णी यांनी सर्वप्रथम ऑनलाइन टेक्नॉलॉजीचे कौतुक केले. त्यांनी आपल्या चर्चेची सुरुवात ६ ऑगस्टला हिरोशिमा दिवसाला झालेल्या ७५ साला पासून लिहलेल्या त्यांच्या लेखाने केली. त्यांचे म्हणणे होते की, या ६ वर्षात देश तीन संकटात अडकला आहे. एकतर कोरोना महामारी, आर्थिक संकट आणि भारताच्या लोकशाही वरील होणारे आक्रमण. तसेच भारताचा नागरिक या सर्व संकटाच्या बाबतीत किती गंभीर आहे? अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
आज भारताची संविधानिक संस्था, लोकतांत्रिक संस्था आहेत. या सर्व सरकारच्या अजेंडावर चालतील अशी रणनिती बनवली जाते आहे की, सर्व काही ठिक सुरू आहे. याचा अर्थ नागरिकांच्या मेंदूला बदलण्याचा हा प्रयत्न आहे. या संकटाची चाहूल लोकांना नाही. असे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
या चर्चेत सद्भावना संघाचे संयोजक किशन गोरडीया ही सहभागी होते. सद्भावना संघ ग्लोबल अँटीट्युड सर्वांना जोडण्याचा प्रयत्न करीत आहे. सतत अशा चर्चा करून जागृत नागरिक संगठन वाढविण्यासाठी समापन झाले. या चर्चेला मुंबई, गुजरात येथील जमीन स्तरावर कार्य करणारे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here