शुक्रवारी आढळले ४०३ कोरोनाबाधित; ८ कोरोनाबाधितांचा मृत्यू
जळगाव (प्रतिनिधी) – कोरोना विरोधातील लढाईत आता वैद्यकिय सेवेची सरशी होताना दिसत असून, आज (दि.२५) कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनातून मुक्त होणाऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे. आज तब्बल ८२० कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली असून, दुसरीकडे आज सायंकाळी कोरोना संशयित व्यक्तींचा स्वॅब तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ४०३ कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
आज आढळलेल्या ४०३ कोरोनाबाधितांमध्ये जळगाव शहर- ९१, जळगाव ग्रामीण- १३, भुसावळ-६६, अमळनेर-२९, चोपडा-३०, पाचोरा-२, भडगाव-४, धरणगाव-२०, यावल-३३, एरंडोल-२१, जामनेर-१८, रावेर-७, पारोळा-२४, चाळीसगाव-२५, मुक्ताईनगर-१०, बोदवड-०५ आणि इतर जिल्ह्यांमधील ५ असा समावेश आहे.
दरम्यान, आज ८२० कोरोनाबाधितांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून, आजवर कोरोनामुक्त होणार्यांची संख्या ३६ हजार ७८१ इतकी झाली आहे. आज ८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा १ हजार १४५ वर पोहचला आहे. सद्यपरिस्थितीत ८ हजार ३४९ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.







