स्व.पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भाजपतर्फे विविध उपक्रम

चोपडा (तालुका प्रतिनिधी संदिप ओली) – येथील भाजपा कार्यालयात स्व.पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार मान्यवर पदाधिकार्‍यांच्या हस्ते अर्पण केला.
तसेच तालुकाध्यक्ष पंकज पाटील,तुषार पाठक यांनी स्व. पंडितजीच्या जिवनचरित्रावर प्रकाश टाकला. यावेळी तालुकाध्यक्ष पंकज पाटील,शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल,जिल्हा चिटणीस राकेश पाटील,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील,शहराध्यक्ष तुषार पाठक, जिल्हा संवाद संयोजक भरत सोनगिरे ,कृ.उ.बा.समिती संचालक भरत पाटील,तालुका उपाध्यक्ष चंद्रशेखर ठाकरे, प्रविण चौधरी,गोपाल चौधरी,सरचिटणीस डाॅ.मनोहर बडगुजर,विजय बाविस्कर,अल्पसंख्याक अाघाडीचे संजय श्रावगी,शहर ओबीसी उपाध्यक्ष कैलास पाटील,तेजस जैन,कार्यालय मंत्री मोहित भावे तर शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल यांनी आभार मानले.यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयावर भारतीय जनता पार्टीचा ध्वज लावण्यात आला.
स्व.पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या ‘एकात्म मानवतावाद’ व ‘अंत्योदय’ विचारांना मुर्त स्वरुप देण्यासाठी चोपडा येथील वंचित,गरिब कुटुंबांना शिधा वाटप करण्याचा कार्यक्रम ही मान्यवर पदाधिकार्‍यांच्या हस्ते करण्यात आला.. चोपडा भारतीय जनता पार्टीकडून तालुका व शहरातील सर्व बुथ मध्ये भाजपाचा ध्वज व स्व.पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here