चोपडा (तालुका प्रतिनिधी संदिप ओली) – मागील बऱ्याच वर्षांपासून अनुसूचित जमातीत धनगर समाज समाविष्ट असतांना सुध्दा धनगर समाज वंचीत आहे, वेळोवेळी केंद्र सरकार व राज्य सरकार फक्त अंमलबजावणीचे आश्वासन देते व पुन्हा विसरते तसेच समाजाला सद्याचा राज्य सरकार कडून दहा महिन्यात धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषयावर एकही बैठक न घेता समाजाच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष करीत आहे यामुळे धनगर समाजाच्या प्रत्येक माणसात सरकार विषयी प्रचंड प्रमाणात असंतोष व नाराजी आहे.
त्यामुळे आता धनगर समाज रस्त्यावर उतरून आंदोलनाच्या तयारीत आहे,तरी धनगर समाजाला आरक्षण मिळावे,या साठी आज चोपडा तहसीलदार अनिल गावित व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना तालुक्यातील धनगर समाजा बांधवांच्यावतीने निवेदन देण्यात आले.समाजाच्या वत्तीने “ढोल बजाओ, सरकार जगाओ अंदोलन करण्यात येणार होते. परंतु चोपडा तालुक्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता “ढोल बजाओ आंदोलन स्थगित करुन निवेदन देण्यात आले.यावेळी माजी पंचायत समिती सभापती आत्माराम म्हाळके,नगरसेवक महेंद्र धनगर,भगवान न्हायदे,वासुदेव धनगर,शैलेश धनगर,नंदलाल धनगर,विजय भालेराव,शालिक धनगर,विक्की धनगर,ऋषिकेश धनगर,नरेंद्र भालेराव,योगेश कंखरे,दिपक बिर्हाडे,मेहुल धनगर,लिलाधर धनगर सह समाज बांधवांची उपस्थिती होती.







