जळगाव (प्रतिनिधी गौरव पांडे) – शुक्रवार (दि. २५ सप्टेंबर) रिद्धी जान्हवी फाऊंडेशनतर्फे कोरोना कालावधीत कोरोनाबाधितांना मदत कार्य करणाऱ्या कोरोना योध्द्यांचा सन्मान करण्यात आला.
प्रथमतः शासकीय वैद्यकिय महाविद्यालय जळगावचे डीन डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी गेल्या १०० दिवसात केलेल्या कोरोनाबद्दलच्या उत्तम कामगिरीबद्दल फाऊंडेशनच्या अध्यक्षा चित्रा मालपाणी व दीपा तापडिया यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी डीन डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी कोरोना कालावधीत कोरोनाबाधितांच्या नातेवाईकांना जेवणाचे डबे पुरविल्याबद्दल व सामाजिक कार्याबद्दल रिध्दी जान्हवी फाऊंडेशनचे कौतुक केले. तसेच त्यांच्या पुढील उपक्रमांविषयी माहिती घेऊन त्याबाबत चर्चा करून शुभेच्छा दिल्यात.







