क्षितिज पर्वचे संपादक सनिप रामा कलोते यांचा वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – क्षितिज पर्व न्यूज चॅनल व साप्ताहिक चे संपादक तथा क्षितिज पर्व फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सनिप रामा कलोते यांचा वाढदिवस त्यांच्या मोजक्या मित्र मंडळी क्षितिज पर्व परिवार यांच्यासोबत जनाधर्मा आधार गृह संगटोली नेरे येथील त्यांच्या आश्रमात साजरी करण्यात आला.
वृद्ध आजीआजोबांबरोबर वाढदिवस साजरा करणांचा आनंद खूप वेगळाच असतो. या आजीआजोबांसोबत केक कापून त्यांना गोडधोड खाऊ वाटप करून त्यांना आज खास मेजवानी दिली. सोबत त्यांचे जिवलग मित्र ही सोबत होते, सर्वाना त्यांच्या सांगटोली येथील फार्महाऊस वरती जेवणाची मेजवानी दिली. सर्व जण सुरक्षित अंतर ठेवून सॅनिटायझर मास्कचा वापर करून सनिप कलोते यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास स्नेहकुज आधार गृहचे नितीन जोशी व संगीता जोशी, गायक मुकेश उपाध्ये, गायक सुमेधा लिम्हन, विजय म्हात्रे ,योगिनी वैदू, यशवंत बिडये सर सौ. यशश्री बिडये पत्रकार अजय दुबे, समाजसेवक प्रदीप वायदंडे, पत्रकार शंकर वायदंडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here