अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत हेमाली म्हात्रे हिचे सुयश

रायगड (प्रतिनिधी दिप्ती पाटील) – अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून कोरोना सारख्या महामारीत संपूर्ण महाराष्ट्रात निबंध स्पर्धेचे आवाहन करण्यात आले होते. यामध्ये 1120 निबंध सोशल मीडियाच्या माध्यमातून परिषदेकडे पोहचले. नामांकित शिक्षण तंज्ञाकडून 12 नावे निवडण्यात आली. यामध्ये आपल्या रायगड जिल्यातील सौ. हेमाली बगाराम म्हात्रे (कोप्रोली-उरण) हिने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.* एक दिवा ज्ञानाचा * या विषयावर 1200 शब्द मर्यादा असलेला निबंधा तिने सादर केला होता.
विजेत्या स्पर्धकांना लवकरच ना.छगनराव भुजबळ यांच्या हस्ते रोख रकमेचं पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देण्यात येईल.अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल .ना.छगनराव भूजबळ व कार्याध्यक्ष बापूसाहेब भूजबळ यांच्या हस्ते आज जाहीर करण्यात आला.
यावेळी समता परिषदेचे संघटक सचिव रवी सोनवणे, प्रदेश प्रचारक डॉ.नागेश गवळी, नाशिक कार्याध्यक्ष समाधान जेजुरकर, हर्षल खैरनार उपस्थित होते. विजेत्या स्पर्धकांना लवकरच ना.भुजबळ यांचे उपस्थितीत बक्षिस वितरण केले जाईल.
सुयश प्राप्त हेमाली म्हात्रे हिचे सर्वस्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे केअर ऑफ नेचर संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर, सारडे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे, संपेश पाटील, सुयश क्लासेस आवरेचे अध्यक्ष निवास गावंड यांनी विशेष कौतुक केलं आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here