बेलापूरला सर्पमित्रांकडून धामन सर्पाला जीवदान

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – बेलापूर सेक्टर २८ मध्ये वाटर हाऊसमध्ये घुसलेल्या धामन या सर्पाला सर्पमित्रांनी पकडून पारसिक हिलच्या जंगलात सोडून दिल्याची घटना शनिवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
शनिवारी सकाळी  बेलापुर सेक्टर २८ मधील वाटर हाऊसमध्ये धामन घुसल्याची माहिती वाटर हाऊसचे कामगार पाटील व पदाधिकारी तेजेस खोसे यांनी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे सचिव विरेंद्र म्हात्रे यांना दिली. विरेंद्र म्हात्रे यांनी सर्पमित्र प्रदीप सुतार  यांना बोलवून वाटर हाऊस मध्ये असलेल्या धामिनला व्यवस्थितरित्या पकड़ले आणि जंगलात सोडायला घेवून गेले. वाटर हाऊसच्या पदाधिकारी वर्गाने विरेंद्र म्हात्रे आणि सर्पमित्र प्रदीप सुतार यांचे विशेष आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here