आदिवासी कोळी जमातीच्या अन्यायग्रस्तांना न्याय मिळावा

आदिवासी कोळी समाज समन्वय समितीचे निवेदन

शिरपुर (प्रतिनिधी प्रशांत वाकडे(वरुळ)) – आदिवासी कोळी समाज समन्वय समिती, महाराष्ट्र राज्याचे मुख्य समन्वयक अॅड.श्री. शरदचंद्र जाधव यांनी भुजबळ समितीला देण्यासाठी तयार केलेले निवेदन अभ्यासपूर्ण व होत असलेला अन्यायाचं वास्तव सडेतोडपणे, सत्त्य वस्तुस्थिती परखड शब्दात मांडणारे आहे. ते ३२-३३ जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत देण्यात आले.
अनेक आयुक्तांना, प्रांताधिकाऱ्यांना, तहसीलदारांना तसेच स्थानिक मंत्री,आमदार, खासदार,जिल्ह्याचे पालकमंत्री यांनादेखील देण्यात आले. त्याचाच भाग म्हणून, खानदेश विभाग उपाध्यक्ष रविभाऊ शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली, ता.शेंदवाडे जि.धुळे येथील आ.को. स.स.स. चे सक्रिय क्रियाशील कार्यकर्ते नरेशदादा शिरसाट यांचे मार्फत, गृह राज्यमंत्री ना. जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्यायमंत्री ना.धनंजय मुंडे तसेच खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांना, मुंबईला जाऊन प्रत्यक्ष भेटून, निवेदन देण्यात आले. प्रत्यक्ष भेटीत धनंजय मुंडे यांनी नरेश शिरसाट यांना शब्द दिला आहे की, आदिवासी कोळी जमातीच्या अन्यायग्रस्तांना न्याय मिळे पर्यंत प्रयत्न करत राहणार.
यावेळी बोलताना ना.मुंडे म्हणाले, की भुजबळ समिती ही आपल्या मार्गदर्शनाखाली आहे. त्यामुळे शेवटपर्यंत प्रयत्न करणार, तसेच या वेळचें नागपूर हिवाळी अधिवेशन याच मुद्द्यांवर नक्कीच गाजवणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here