नंदूरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – जिल्हातील नवापूर तालुक्यात वनविभागाने मोठी कार्यवाही करत 3 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे .वनविभागाची गेल्या 10 दिवसात ही चौथी कार्यवाही असल्याने लाकूड तस्कराचे धाबे दणाणले आहे
वनक्षेत्रपाल नवापुर यांना मिळालेल्या माहितीनुसार मौजे विजापुर ता. नवापूर येथे अवैध लाकूड साठा मिळून आला आहे. घराचे बाजुस असलेल्या पडसाळीला लागुन ताज्या तोडीचे कुर्हाडीने घडतल केलेला साग चौपाट 29 नग आढळुन आले .घटनास्थळी आरोपी आढळुन आला नाही. या कारवाईत सहभाग व शिवण ही लाकडे मोठ्या प्रमाणावर सापडले आहेत. सदरील अवैधरित्या साठविण्यात आलेला मुद्देमाल जप्त करून शासकीय वाहनाने घेऊन जाऊन वनपाल आगार यांचे ताब्यात देण्यात आला आहे.
याबाबत वनपाल वडकळंबी यांनी सदर संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. सदर कार्यवाही वनक्षेत्रपाल नवापूर- प्रथमेश हाडपे किडनी केली असून अशाच प्रकारच्या कारवाया अनेक वेळा करण्यात आले आहेत परंतु यात केवळ लाकूड व मुद्देमाल सापडतो परंतु मुख्य आरोपी का सापडत नाही हा प्रश्न पडतो. तरी अशाच प्रकारे मध्यरात्री मोठ्याप्रमाणावर लाकूड साठा हा परिसरात येत असतो अशी चर्चा शहरात सुरू आहे. वन विभागाची ही कारवाई वनपाल वडकळंबी -डि के जाधव, वनपाल खेकडा -ए एन चव्हाण, वनरक्षक -दिपक पाटील, लक्ष्मण पवार, संजय बडगुजर, कमलेश वसावे, संतोष गायकवाड, अनिल वळवी, सतिश पदमर, कल्पेश अहीरे व नितीन पाटील यांनी केली आहे ..








