शनिवारी आढळले ४६७ कोरोनाबाधित; १० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू
जळगाव (प्रतिनिधी) – कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीचा अहवाल आज (दि.२६) सायंकाळी मिळाल्यानंतर जिल्ह्यात ४६७ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले. तसेच ७७१ कोरोनाबाधितांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. दरम्यान आज १० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, आज आढळलेल्या कोरोनाबाधितांमध्ये सर्वाधिक जळगाव शहरात १८४ रुग्ण आढळून आले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढ असून, जिल्ह्यातील ३७ हजार ५५२ कोरोनाबाधितांनी आजवर कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. आज आढळलेल्या ४६७ कोरोनाबाधितांमध्ये जळगाव शहर- १८४, जळगाव ग्रामीण- १८, भुसावळ-३०, अमळनेर-३९, चोपडा-१८, पाचोरा-१७, भडगाव-२७, धरणगाव-५, यावल-७, एरंडोल-५, जामनेर-३३, रावेर-३०, पारोळा-२५, चाळीसगाव-८, मुक्ताईनगर-१०, बोदवड-१० आणि इतर जिल्ह्यांमधील २ असा समावेश आहे.
दरम्यान आज १० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ हजार १५५ झाली आहे. सद्यपरिस्थिती ८ हजार ३५ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.







