शाळेबाहेरची शाळा या उपक्रमाबाबतची पाचोरा तालुक्याची ऑनलाइन झूम मिटिंग संपन्न

जळगांव (संपादक सुनिल पाटील) – शाळेबाहेरची शाळा या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी आपल्या संपूर्ण पाचोरा तालुक्यात होण्याच्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी बी एस अकलाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 26/09/2020 ला सकाळी ठीक 10.30 वाजता झूम सभेचे आयोजन शिक्षण विभाग जिल्हा परिषद जळगाव, प्रथम फाउंडेशन व गटसाधन केंद्र पंचायत समिती पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
या सभेला गटशिक्षणाधिकारी विकास पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार, समाधान पाटील, श्रीमती गायकवाड, गटसाधन केंद्रातील विषय साधनव्यक्ती, तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच प्रथम महाराष्ट्र संस्थेचे नाशिक विभाग प्रमुख गणेश पाटील, पुणे विभाग प्रमुख मच्छिंद्र पडवळ, योगेश कोळी, विकास निकुंभे, संजय ठाकरे, युवराज ठाकरे, किरण वसावे, मनीषा गावित, मंगेश डगे उपस्थित होते. या सभेला जिल्हा परिषद शाळांचे 151 मुख्याध्यापक सहभागी होते
प्रथम महाराष्ट्र संस्थेच्या वतीने “शाळेबाहेरची शाळा” ह्या उपक्रमाची संकल्पना स्पष्ट करण्यात आली. गणेश पाटील, मच्छिंद्र पडवळ यांनी या उपक्रमाची पार्श्वभूमी समजावून सांगितली. सभेचे प्रास्ताविक विजय पवार (शिक्षण विस्तार अधिकारी) यांनी केले. शिक्षकांनी काही प्रश्न विचारले, त्यावर त्यांचे समाधान करण्यात आले. समारोपीय मनोगतात गटशिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी मार्गदर्शन केले व सर्वांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here