वर्धा (प्रतिनिधी मनोज बाचले) – कोरोना सर्व्हेक्षणाच्या कामकाजातून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मुक्त करण्यासाठी तसेच शिक्षकांच्या असलेल्या विविध समस्या सोडविण्यासाठी माजी शिक्षक आमदार व्ही.यू. डायगव्हाने यांच्या नेतृत्वात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ नागपूर उद्या (दि.२८) दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी नागपूर यांना निवेदन देवून चर्चा करणार आहेत.
यावेळी जास्तीत जास्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून कोरोनाविषयक आरोग्य नियम मास्क घालून व आल्यानंतर सोशल डिस्टसिंग पाळून संघटनेचा आवाज बुलंद करावा असे आवाहन ग्रामीण अध्यक्ष अनिल गोतमारे, ग्रामीण कार्यवाह संजय वारकर, शहराध्यक्ष विठ्ठल जूनघरे, शहर कार्यवाह प्रमोद रेवतकर व संपूर्ण ग्रामीण – शहर कार्यकारिणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ नागपूर यांनी केले आहे.







