चोपडा तालुक्यात आढळले सर्वाधिक ७० कोरोनाबाधित

corona

जिल्ह्यात ४१२ कोरोनाबाधित तर ७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

जळगाव (प्रतिनिधी) – कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीचा अहवाल आज (दि.२७) सायंकाळी प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यात ४१२ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यातील सर्वाधिक ७० कोरोनाबाधित चोपडा तालुक्यातील आहेत. आज ५४१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.
आज आढळलेल्या ४१२ कोरोनाबाधितांमध्ये जळगाव शहर- ६२, जळगाव ग्रामीण-८, भुसावळ-५५, अमळनेर-३४, चोपडा-७०, पाचोरा-२१, भडगाव-४, धरणगाव-१९, यावल-२८, एरंडोल-२९, जामनेर-१७, रावेर-९, पारोळा-७, चाळीसगाव-३२, मुक्ताईनगर-१, बोदवड-७ आणि इतर जिल्ह्यांमधील ९ असा समावेश आहे.
दरम्यान, आज ५४१ रूग्णांनी कोरोनावर मात केल्यानंतर आजवर कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या ३८ हजार ०९३ झाली आहे. दरम्यान जिल्ह्यात कोरोनामुळे ७ रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा १हजार १६२ वर पोहचला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ७ हजार ८९९ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here