केअर आँफ नेचर (CON ) सामाजिक संस्थेतर्फे आदिवासी मुलांना मोफत सायकल वाटप

रायगड (प्रतिनिधी दिप्ती पाटील) – अवघे विश्व हेचि माझे घर ही संकल्पना मनात ठेवून. आपण ह्या जगात थोडं काही तरी केले पाहिजे . या संकल्पनेनुसार आपल्या सभोवताली अगदी आर्थिक दृष्टीने मागासलेल्या समाजासाठी मदतीचा हाथ हा केअर आँफ नेचर (CON) ही संस्था नेहमी देत असते. आणि संस्थेच्या उपक्रमानी सतत हे दाखवून दिल आहे . मग लॉकडाऊन काळात मोफत अन्न धान्य वाटप असेल , किवा मोफत मास्क व सैनीटाइजर वाटप, असेल किवा मोफत शैक्षणिक साहित्य मदत असेल. याना त्या माध्यमातून केअर आँफ नेचर(CON) ही संस्था सतत अग्रेसर असते .
रविवार दिनांक २७/९/२०२० रोजी केअर आँफ नेचर संस्थेच्या तर्फे राणसई येथील खैरकठि आदिवासी वाडिवर आदिवासी मुलाना मोफत???? १८ सायकल चे वाटप करण्यात आले. संस्थेचा उद्देश्य एकमेव आहे की गरीब गरजु मुलांना आर्थिक दृष्टया सायकल घेणे परवडत नाही आणि त्या अभावी शारीरिक करसरत होत नाही आणि बाजार पेठ खुप दूर असल्याने अगदी पायी चालत येणे अवघड होते. हे सर्व लक्षात घेऊन सामाजिकतेची जाणीव ठेवत १८ दुचाकी सायकल चे वाटप करण्यात आले आहे.सायकल हातात मिलताच आदिवाशी मुलांच्या चेहऱ्यावरील जो आनंद पाहायला मिळाला हे पाहून केअर आँफ नेचर संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर हे गहिवरून गेले. सोबत सारडे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे,  अनिल घरत, संपेश पाटील, रोशन पाटील, समाधान पाटील हे मान्यवर उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here