नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव पोलीस ठाण्यात विनोदी अभिनेत्री भारती सिंग यांच्या विरोधात निवेदन सादर

धडगाव (प्रतिनिधी भूषण पावरा) – खतरा खतरा खतरा कलर्स टीव्ही वरील शोमध्ये विनोदी अभिनेत्री श्रीमती भारती सिंग यांनी “ये आदिवासी लोकही ऐसे अंडरवेअर पहनते है” असा अश्लील शब्द बोलून आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या याप्रकरणी धडगाव येथील पोलिस ठाण्यात भारती सिंग विरोधात निवेदन देण्यात आले .
एकीकडे आदिवासींना संबंधित भाषणात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की आदिवासींचे देशाला मोठे योगदान आहे त्यांचे योगदान येणाऱ्या भावी पिढीला प्रेरणा देणार आहेत ,त्यांचे सन्मान झाला पाहिजे, त्यांच्या स्वाभिमान ठेवला पाहिजे ,व त्यांचे गौरव झाले पाहिजे व भावी पिढीला त्याची प्रेरणा दिली गेली पाहिजे परंतु दुसरीकडे आदिवासींवर वारंवार वार करणारे अपशब्द बोलणाऱ्यांची संख्या काही कमी नाही काही दिवसांपूर्वीच एबीपी न्यूज चैनल वरून आदिवासींचे भगवान मानले जाणारे व क्रांतिकारक खाज्या नाईक यांना डाकू म्हणून आदिवासींच्या भावनांना ठेच पोहोचवले होते तेवढ्यातच लगेच परत ये आदिवासी लोग,ही ऐसा कच्चा अंडरविअर पेहनते है असा अश्लील वाक्य वापरून आदिवासींच्या भावनांना ठेच पोहचवला आहे, आदिवासी समाजाला बदनाम करण्याचे काम जाणुन बुजुन केलेला आहे
कोणत्याही समाजाविषयी अपशब्द वापरून त्या समाजाला बदनाम करणे व त्या समाजाची खिल्ली उडवणे हे घटनाबाह्य आहे कारण कोणत्याही समाजाला अस्लिल शब्द वापरून समाजाला बदनाम करण्याचा अधिकार राज्य घटनेने कोणालाच बहाल केलेले नाही परंतु हा प्रकार आत्ताच नाही कधीपासून चालत आहे.निवेदन करूनही शासन प्रशासन यांच्यावर चौकशी करून कारवाई करण्यासाठी अपेशी ठरत असल्याचे चित्र समोर आहेत यापुढे कोणीही आदिवासी समाजाविषयी शब्द बोलण्याची हिंमत करणार नाही अशी चौकशी करून कारवाई करण्यात यावी व त्यांच्यावर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार व सायबर क्राईम कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी व जर याकडे प्रशासनाकडून चौकशी लांबणीवर ठेवण्यात आले तर पुन्हा समस्त आदिवासी बांधवांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे मत यावेळी बिरसा क्रांती दलाकडून करण्यात आले आहे व कलर्स टीव्ही संपादक व कलर टीव्ही शो च्या विनोदी अभिनेत्री श्रीमती भारती सिंग यांची सखोल चौकशी करून तात्काळ अटक करण्यात यावी तसेच मागील प्रकरणाचा आढावा यावेळी बिरसा क्रांती दलाने घेतला आहे आदिवासी क्रांतिकारक खाज्या नाईक यांना डाकू म्हणणाऱ्यावरही कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा येणाऱ्या दिवसात आदिवासींकडून सडेतोड आंदोलन करण्यात येईल असा इशारा आदिवासी संघटनेकडून देण्यात आला आहे
या प्रसंगी बिरसा क्रांती दल नंदुरबार जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी व धडगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी व समस्त आदिवासी बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here