पुणे -सोगावकर(प्रतिनिधी)- होप मेडिकल फाउंडेशनच्या विश्वस्त डॉ. दीपा देवळेकर आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अंजुम इनामदार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेले काम अत्यंत प्रेरणादायी आहे. सेवेचे व्रत स्वीकारून माणुसकीचे दर्शन त्यांच्या कामात होते.
रुग्ण हक्क परिषद त्यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना महात्मा गांधी सेवा पुरस्काराने सन्मानीत करत आहे .
यावेळी महात्मा गांधी यांची जयंती क्रांतिसूर्य महात्मा फुले वाडा, गंजपेठ येथे साजरी करण्यात येणार आहे. २ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता कार्यक्रम सुरू होईल. यावेळी पुरस्कार वितरण कार्यक्रमासोबतच जनहिताच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष रुग्ण हक्क परिषद वेधणार आहे.
शासकीय रुग्णालयात बेड न मिळाल्याने नाईलाजाने खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या आणि अवाजवी लाखोंची बिले भरावी लागलेल्या लोकांची आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे. त्यांना बिलांचा परतावा तात्काळ द्यावा. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना एक लाख तत्काळ मदत घ्यावी. यासाठी भारताचे राष्ट्रपती मा. रामनाथ कोवींद, पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी, आणि राज्याचे मुख्यमंत्री मा. ऊद्धव ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याचे रुग्ण हक्क परिषदेचे केंद्रीय कार्यालय सचिव दिपक पवार म्हणाले.
एका महात्म्याच्या पायाशी बसून, दुसऱ्या महात्म्यास अभिवादन करण्यासाठी सत्य, अहिंसाच्या तत्वाने क्रांती घडविणाऱ्या दोन्ही महात्म्यांना वंदन करून पत्राद्वारे मागण्या करू. याआधीही २ जून २०२० रोजी रूग्ण हक्क परिषदेने राज्यातून पंतप्रधान कार्यालयात पत्र पाठविल्याने कोव्हीड चाचणीचा दर नियंत्रित झाला. त्यामुळे रास्त दरात चाचण्या झाल्या. लेखणीत ताकद असून जनतेने राज्यात सर्वत्र गांधी जयंती साजरी करावी. असे आवाहन अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केले.
Home पश्चिम महाराष्ट्र पुणे डॉ. दीपा देवळेकर आणि अंजुम इनामदार यांना रुग्ण हक्क परिषदेचा यावर्षीचा महात्मा...







