शारीरिक शिक्षक महासंघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार

शिरपुर (प्रतिनिधी प्रशांत वाकडे(वरुळ)) – जिल्हा युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ व धुळे जिल्हा युवा महिला शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ चे सर्व नवनिर्वाचित पदाधिकारींचे आ. काशिराम पावरा सत्कार करण्यात आला. यावेळी क्रीडा मंत्री आ. अमरीश भाई पटेल , नगराध्यक्षा.जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष. भूपेशभाई पटेल, नगरसेवक. तपणभाई पटेल यांनी देखील या शिक्षकांच्या पुढील वाटचालीस आशीर्वाद दिले.
कार्यक्रमास महाराष्ट्र युवा शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे तायपा शेडगे सातारा, संदीप मनोरे जळगाव यांनी देखील दूरध्वनी द्वारे शुभेच्छा दिल्या. जिल्हा युवा अध्यक्ष सागर माळी, कार्याध्यक्ष हरीश माळी, उपाध्यक्ष जयेशकुमार राजपूत, सुभाष पवार, सचिन करणं शिंदे, जितेंद्र पाटील, कुणाल गिरासे, महिला युवा अध्यक्ष जोस्त्ना जाधव, कार्याध्यक्ष पूजा जैन, उपाध्यक्ष मनीषा पाटील, सचिव निकिता पाटील, मयुरी सावळे, तेजस्विनी गिरासे, हर्षली पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन- जोस्त्ना जाधव तर आभार प्रदर्शन- सुभाष पावरा यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here