एसीपी घाटकोपर कुंडलिक निगडे यांचा कोरोना योद्धा गौरवने सन्मान

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक रवि ना वैद्य यांच्यामार्फत पोलिसांच्या मुलांना 5 टक्के आरक्षण मिळवून देणारी महाराष्ट्रातील एकमेव संघटना आहे संघटनेच्या महाराष्ट्रभर 22 ठिकाणी शाखा पसरलेले आहेत सामाजिक व अनेक पोलीस अधिकारी पोलीस कुटुंब ,पोलीस कर्मचाऱ्यांचे प्रश्‍न शासन दरबारी मांडून त्यांना न्याय दिलेला आहे तसेच धीरज पार्सेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मीरा-भाईंदर पालघर येथे चार एम्बुलेंस पोलिसांच्या सेवेसाठी व समाजातील गरीब गरजू लोकांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत तसेच पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी कोरोना महामारीमध्ये त्यांच्या कार्याची दखल म्हणून शाहू फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी समाजसेवक घाटकोपर आदेश गायकवाड यांच्या सूचनेनुसार घाटकोपर एसीपी श्री.निगडे यांची कोरोना योद्धा गौरव सन्मानाकरिता निवड करण्यात आली
घाटकोपर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त कुंडलिक निगडे यांनी कोरोना महामारीमध्ये गेले 8 महिने निःस्वार्थपणे आपले कर्तव्य बजावत आहे आपले कर्तव्य बजावत असताना प्रथम आपले पोलिस व समाजातील लोकांचीसुद्धा ते काळजी घेत आहे अनेक गरजू गरीब लोकांना त्यांनी स्वःखुषीने मदत केलेली आहे घाटकोपरमध्ये कोरोनाचा आकडा वाढत असून सुद्धा त्यांनी आपले काम चोखपणे बजावलेले आहे असे करत असताना ते स्वतः सुद्धा आपल्या कार्याला झोकून दिलेले आहे जास्तीत जास्त कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून त्यांनी प्रत्येक गल्लीबोळात जाऊन जनजागृती केली आहे कोणताही जातीभेद न मानता त्यांनी प्रत्येकाला न्याय दिलेला आहे त्यांना रात्री अपरात्री कोणीही मदतीसाठी फोन केला तर ते त्याला रिकाम्या हाती पाठवत नाही नेहमी त्यांना मदत करतात त्यांच्या कार्याची दखल म्हणून मुंबई, ठाणे, नवी मुंबई पोलीस बॉईज असोसिएशन तथा गृहरक्षक दल होमगार्ड संघर्ष समिती मार्फत एसीपी कुंडलिक निगडे यांना कोरोना योद्धा गौरव 2020 ने सन्मानित करण्यात आले.कोरोना योद्धा सन्मान पत्र मिळाल्यानंतर मुंबईतील पोलीस बॉईज असोसिएशन पदाधिकारी व सदस्य यांना त्यांनी मार्गदर्शन केले व सर्वांचे विचारपूस करून कोण कोण काय काम करतात याची कुतूहलाने सर्वांची चौकशी करून पोलीस बॉईज संघटनेला पुढील वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच पोलीस बॉईज असोसिएशन मध्ये गेल्या 2 वर्षापासून प्रकाश शेरे हे पी.आर.ओ. मुंबई पदावर कार्यरत असताना आजपर्यंत त्यांनी अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे तसेच अनेक पोलिस व सामाजिक प्रश्‍न त्यांनी सोडलेले आहे अनेक पूरग्रस्त भागांना भेटी देऊन प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन अन्नधान्य व कपड्यांची त्यांनी मदत केली आहे अनेक पोलिस स्टेशनमध्ये प्रत्यक्ष जाऊन लोकडाउन काळामध्ये जंतुनाशक फवारणी, तोंडाला लागणारे मास्क व होमिओपॅथी औषध पोलीस स्टेशनला मोफत त्यांनी दिलेले आहे. अनेक पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना कोरोना योद्धा प्रमाणपत्र देऊन त्यांनी सन्मानित केलेले आहे गरीब गरजू लोकांचे कोरोना काळामध्ये बिलसुद्धा त्यांनी कमी केलेले आहे त्यांच्या कार्याची दखल म्हणून पोलीस बॉईज संघटनेचे रवी वैद्य संस्थापक, सिद्धार्थ डी जाधव प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य, सुशील मोरे निवड समिती कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य, धीरज वि पार्सेकर निवड समिती अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, अमोल पटेकर सरचिटणीस मुंबई, अमोल माने प्रदेश अध्यक्ष मुंबई यांच्यामार्फत प्रकाश शेरे यांची मुंबई अध्यक्षपदी पदोन्नती देऊन नियुक्ती करण्यात आली.सुशील मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई ,ठाणे ,नवी मुंबई, पनवेल टीमला मार्गदर्शन त्यांनी केले संघटनेचे उद्दिष्टे काय व त्याचे फायदे तोटे आणि संघटनेमध्ये तुमचा येण्याचा हेतू काय आणि पोलीस व सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही कशा प्रकारे वावरले पाहिजे सामाजिक क्षेत्र व पोलिस अधिकारी व पोलीस कर्मचारी व पोलीस कुटुंब यांचे प्रश्न कशाप्रकारे सोडवले पाहिजे याबाबतचे संपूर्ण मार्गदर्शन त्यांनी दिले तसेच नवीन नियुक्ती झालेले नांदेड जिल्हाध्यक्ष दिनेश भालेराव, वाहतूक विभाग पनवेल शहर अध्यक्ष नामदेव मोहिते व ठाणे जिल्हा अध्यक्ष सतीश बनसोडे यांना फुलगुच्छ देऊन त्यांचासुद्धा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला.
सिद्धार्थ डी जाधव प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेनुसार प्रदेशाध्यक्ष मुंबई अमोल माने यांच्या मार्गदर्शनाखाली घाटकोपर येथील मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था होमगार्ड येथील शस्त्र विभागात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी यांनासुद्धा कोरोना योद्धाने सन्मानित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here