भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) – भुसावळ येथील जागर प्रतिष्ठान कडून नुकताच दहा गरजू कुटुंबांना एक महिन्याचा किराणा देण्यात आला. लॉक डाऊन व अनलॉक मध्ये देखील अनेकांच्या पोटाचा प्रश्न अजूनही धगधगत आहे. याची जाणीव ठेवत. लॉक डाऊन कारणे बे रोजगार झालेल्या निराधार व बेरोजगार कुटुंबांना प्राधान्य देत एक महिन्याचा किराणा देण्यात आला.
भुसावळ शहरातील ही समस्या व उपासमारीची दाहकता जागर मित्रांनी प्रतिष्ठान च्या पदाधिकाऱ्यां पर्यंत पोहचविले. त्यावर त्वरित जागर व्हॉट्स ऍप ग्रुप वर आवाहन करताच मदत उभी राहिली. आणि गरजू कुटुंबांच्या पोटाचा प्रश्न सोडविता आला. प्रसंगी जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष व रावेर येथील सौ. के. एस. ए. गर्ल्स क. महाविद्यालयाचे प्रा. पंकज पाटील, जागर प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष व श्री मल्टी सर्व्हिसेस चे संचालक श्रीराम सपकाळे, जागर प्रतिष्ठान चे कोषाध्यक्ष राजपथ क्लासेसचे संचालक हृषिकेश पवार व जागर मित्र रमेश कोळी उपस्थित होते.
घरात राहिले तर उपासमार, बाहेर पडले तर कोरोना
लॉक डाऊन चा परिणाम सर्वच क्षेत्राला बसला आहे. परिणामी बेरोजगारी वाढली. त्यात घरात राहिले तर उपासमार बाहेर पडले तर कोरोणा अशी अवस्था होवून बसली आहे. या कठीण प्रसंगात टीम जागर आपल्या परीने मदततीस सौजन्य तत्पर आहे.
– प्रा. पंकज पाटील (अध्यक्ष जागर प्रतिष्ठान , भुसावळ)







