गृह विभागाकडून कक्ष अधिकारी दीपक सावंत यांचे होमगार्ड महासमादेशक यांना 300 कोटी घोटाळ्यासंदर्भात चौकशीचे आदेश पारित

मुंबई (उपसंपादक सतीश बनसोडे) – दिनांक 28/ 9/ 2020 रोजी मंत्रालय येथील प्रशासकीय भवन गृहविभाग विशा/8 येथील कक्ष अधिकारी दिपक सावंत यांचे प्रत्यक्ष कार्यालयांमध्ये जाऊन मा महासमादेशक होमगार्ड कार्यालयात झालेला भ्रष्टाचार व 34 जिल्ह्यातील जिल्हा समादेशक होमगार्ड यांच्या कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी व केंद्र नायक, निर्देशक व हवलदार निदेशक यांनी केलेल्या 300 कोटी घोटाळ्यासंदर्भातील काय कारवाई झाली याबाबत सिद्धार्थ जाधव (प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य) होमगार्ड संघर्ष समिती यांनी कुठपर्यंत कारवाई झाली यांनी भेट घेतली
दीपक सावंत कक्ष अधिकारी यांनी कारवाई करण्याचे महासमादेशक होमगार्ड यांना आदेश दिलेले आहेत आणि सदर भ्रष्टाचार झालेला 300 कोटी चा तात्काळ अहवाल शासनास पाठवावे याबाबतचे पत्र महासमादेशक होमगार्ड संजय पांडे आयपीएस दिलेले आहे सदर पत्र हे जुलै 2020 मध्ये दिलेले आहेत तरीसुद्धा गेले दोन महिने कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी श्री. धकाते यांनी ती फाईल लपवून ठेवलेली आहे दीपक सावंत कक्ष अधिकारी यांनी प्रत्यक्ष श्री.धकाते यांना फोन करून सुद्धा सिद्धार्थ जाधव यांना भ्रष्टाचाराची काय कारवाई झाली याची माहिती द्या तरीसुद्धा सिद्धार्थ जाधव यांना खोटी माहिती दिली की संजय पांडे सीजी यांच्याकडे सदर फाईल आहे अभिलेखाकडे फाईल आहे संजय पांडे डीजी स्वतःकडे ठेवून घेतात आमच्याकडे अजून आलेली नाही अशी खोटी माहिती सिद्धार्थ जाधव यांना दिली तसेच सीजी कार्यालयातील परवेज शेख हेड क्लास लिपिक यांनासुद्धा श्री. धकाते यांनी भ्रष्टाचाराची फाईल देण्याची विनंती केली परंतु मला वेळ नाही मला खूप कामे आहेत मला हीच कामे नाही अशी अशोभनीय भाषा वापरली श्री. धकाते यांच्या समोर तरीसुद्धा सिद्धार्थ जाधव यांना दीड तास शेवटी भ्रष्टाचाराची फाईल कारवाईची माहिती श्री.धकाते यांनी दिलीच नाही कारण तिची कार्यालयातील संपूर्ण अधिकारी गेले दहा वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत आहे त्यामुळे भ्रष्टाचार हा त्या जुन्या अधिकाऱ्यांनीच केलेला आहे हे सिद्ध होत आहे.परवेज शेख हा गेल्या दहा वर्षापासून सीजी कार्यालयांमध्ये कार्यरत आहे आजपर्यंत त्याची बदली सुद्धा झालेली आहे आणि त्याचा प्रकरणामध्ये परवेश शेख याचा सुद्धा हात आहे आणि हे सर्व गोष्टी त्याला माहिती आहे कारण त्याच्यात कार्य कालामध्ये सिद्धार्थ जाधव यांनी तक्रारी केलेले आहे तसेच महा समादेशक होमगार्ड कार्यालय मध्ये 17 अर्ज करून सुद्धा गेले सात महिन्यांपासून माहिती दिलेली नाही त्याचे अपील करून सुद्धा संबंधित अर्जदारास सिद्धार्थ जाधव यांना कारवाईची माहिती दिली नाही तसेच सिटी आय घाटकोपर येथे सुद्धा माहिती अधिकारात माहिती मागितली असता तिथे सुद्धा अपील करून सुद्धा माहिती दिलेली नाहीविशेष बाब म्हणजे गृह विभागातील कक्ष अधिकारी दीपक सावंत यांनी श्री.धकाते यांना 300 कोटी भ्रष्टाचारा संबंधित चौकशीचे आदेश देऊन सुद्धा, प्रत्यक्ष फोनद्वारे बोलून सुद्धा त्यांच्या गृहविभागाच्या पत्राला सीजी कार्यालयातील श्री धकाते यांनी केराची टोपली दाखवली आहे यावरून असे सिद्ध होते की महासमादेशक कार्यालयातील अधिकारी कर्मचारी हे गृह विभागाच्या अधिकाऱ्यांना जुमानत नाही हे सिद्ध झाले आहे या भ्रष्टाचारात संबंधित महा समादेशक होमगार्ड संजय पांडे लक्ष घालतील का? या श्री.धकाते अधिकाऱ्यावर कारवाई करतील का? श्री.धकाते यांची हाईट 4 फूट आहे आणि मानसेवी होमगार्ड यांचे हुद्दे लावून घालून त्यांनी गणवेश परिधान करून संचालन केले आहे आणि ते मानसेवी द्वितीय समादेशक अधिकारी होते याचे कोणतेही कागदपत्र अभिलेखावर नाही असे स्वतः माहितीच्या अधिकारात श्री.धकाते यांनी लेखी दिले आहे शासनाचे कोणतेही गणवेश व हुद्दे घालण्याचे अधिकार नसताना फक्त चांगले दिसण्यासाठी वेतनी अधिकारी श्री.धकाते यांनी गणवेश घातल्याचे लेखी माहितीच्या अधिकारात दिलेले आहे फक्त मानसेवी होमगार्ड यांना नियम दाखवले जातात स्वतः मात्र भ्रष्टाचार करतात तरीसुद्धा त्यांनी माहितीच्या अधिकारात खोटी माहिती देऊन दिशाभूल केली आहे ती धकाते यांनी चुकीचा गणवेश घातल्याबद्दल त्यांच्यावर सुद्धा कारवाई महासमादेशक करतील का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here