एका दिवसात १०७ कोरोनाबाधित सापडल्याने धुळे चिंतेत

धुळे (प्रतिनिधी) – धुळे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत तब्बल १०७ कोरोनाबाधित आढळले असून एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. धुळे जिल्ह्यात बाधितांचा आकडा १ हजार ७३ तर धुळे महानगरातील रुग्णसंख्या ५०० वर पोहोचली आहे.
धुळे जिल्ह्यात गेल्या आठवडापासून कोरोना बाधितांमध्ये सतत वेगाने वाढ होत आहे. धुळे शहर आणि शिरपूर शहरात रुग्णवाढीचा दर चिंताजनत स्थितीत पोहोचल्याने प्रशासनासमोर आव्हान उभे राहिले आहे. गेल्या २४ तासांत धुळे जिल्ह्यात १०७ बाधित आढळले आहेत. यात धुळे महानगरात ६२, शिरपूर २६, धुळे ग्रामीण ८, सडगाव, चांदे, सोनगीर, वेल्हाणे येथे प्रत्येकी एक तर साक्रीमध्ये ११ कोरोनाबाधित सापडले आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा १ हजार ७३ वर पोहोचला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here