भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) – महाराष्ट्राचं भविष्य व महाराष्ट्रातील तमाम युवकांच प्रेरणास्थान आदरणीय आमदार रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज कुऱ्हा नगरीतील कोविड यौद्धा, निस्वार्थी व्यक्तिमहत्व, समाजसेवेचा वारसा जपणारे आदरणीय आयुर्वेदाचार्य Dr रमाकांत दादा पाटील यांना आज सन्मानित करण्यात आलं.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष वाय.आर.पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख आप्पासाहेब नाना पाटील, तालुकाध्यक्ष दिपक भाऊ मराठे, राष्ट्रवादी ग्रंथालय सेलचे तालुकाध्यक्ष किशोरभाऊ पाटील, राष्ट्रवादी विध्यार्थी काँगेसचे तालुका उपाध्यक्ष राजेंद्रभाऊ बावस्कर व सर्व राष्ट्रवादी परिवार उपस्थित होता.







