ठाणे शहरातील ३२.०१ टक्के कुटूंबांचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण

thane-corona

सर्वेक्षण मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करण्याचे महापौर,आयुक्तांचे आवाहन

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या मोहिमेअंतर्गत आजपर्यंत ठाणे शहरातील ३२.०१ टक्के कुटुंबाचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण झाले असून जवळपास १ लाख ४० हजार ९३६ कुटूंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. दरम्यान कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी व नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही महत्वाची मोहिम संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. कोरोनाची महामारी नियंत्रित करण्यासाठी आणि मृत्यू दर कमी करण्यासाठी संपूर्ण राज्यात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. ठाणे शहरामध्येसुद्धा महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक तसेच महापालिका कर्मचारी यांच्या सहाय्याने ही मोहिम व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे.thane-corona1दिनांक १८ सप्टेंबर २०२० पासून शहरात ही मोहीम सुरु असून यासाठी एकूण अंदाजे ५०० पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत शहरातील प्रत्येक कुटूंबांच्या आरोग्याचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. आजपर्यंत ठाणे शहरातील ३२.०१ टक्के कुटुंबाचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण झाले असून जवळपास १ लाख ४० हजार ९३६ कुटूंबांचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सर्वेक्षण पथकांमार्फत सुमारे ४ लाख २३ हजार ५९८ नागरिकांच्या आरोग्याचे सर्वेक्षण करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here