खाकी वर्दीतल्या माणुसकीचे दर्शन घडविणारे सुरज चौगुले

suraj-chaughule

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – कापूरबावडी पोलीस स्टेशन चे पोलीस शिपाई सुरज चौगुले आपले कर्तव्य बजावताना कोरोनाग्रस्त झाले व कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेत रुजू झाले.
काल एका रुग्णाला पुणे येथे B+ प्लाझ्माची गरज होती. हे सुरज चौगुले ह्यांना कळाले असता त्यांनी कापूरबावडी वरून मुलुंडला येऊन अमूल्य प्लाझ्मा दान केला. रात्रीच तो प्लाझ्मा पुणेला रवाना करण्यात आला.
खाकी वर्दीतल्या माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या चौगुले यांचे पोलीस बॉईज असोसिएशन तथा गृहरक्षक दल होमगार्ड संघर्ष समिती कडून अभिनंदन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here