माध्यमिक शिक्षक संघ शिष्टमंडळाने उपमुख्य अधिकारी उमरेड यांची घेतली भेट

umred-vidharbha

वर्धा (प्रतिनिधी मनोज बाचले) – आज बुधवार दि 30-9-2020 ला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ ,उमरेड येथील पदाधिकारी व सर्व शाळेतील शिक्षक यांनी उपमुख्य अधिकारी, नगर परिषद उमरेड यांची भेट घेतली.
“माझे कुटुंब माझी जवाबदारी ” याबाबत चर्चा करण्यात आली, चर्चेअंती ठरविण्यात आले की जो पर्यंत शिक्षकांना आपत्ती व्यवस्थापन समिती द्वारा मुख्याध्यापकामार्फत लेखी आदेश प्राप्त होत नाही ,तोपर्यंत covid संदर्भातील “माझे कुटुंब माझी जवाबदारी ” या प्रक्रियेतील कोणतीही कामे करणार नाही.
याप्रसंगी कार्यकारिणीचे विजय माजरीकर, अजय गुप्ता, नंदकिशोर कानडे,विशाल बंड सुधाकर वंजारी,गुंडेराव येवले, कुसराम, माटे,चिचुलकर, अंकेश्वर ठाकरे,नाईक, शेंडे,सेलोटे,श्रीमती क्षीरसागर मॅडम तसेच सर्व शाळेतील शिक्षक social distance व मास्क घालून covid संदर्भातील सर्व सूचनांचे पालन करून उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here