नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – वाशी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 27/09/2020 रोजी सकाळी 09.00 वा ते 09.30 वा सुमारास फिर्यादी नामे प्रकाश कानिरामजी भागवत , वय 39 वर्षे हे त्यांची पत्नी व भाऊ असे वाशी सेक्टर 16 येथील खानावळ व्यवसायाचे ठिकाणी असताना त्यांचेकडे आश्रयास असलेला मुलगा वय 17 वर्षे अंदाजे याने चहा पिण्याचा बहाणा करुन फिर्यादी यांचे राहते घरी गेला व त्याने तेथुन सोन्या – चांदीचे दागीने व रोख रक्कम असलेली काळया रंगाची बॅग ही त्यांच्या सम्मतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरुन नेली म्हणून दिलेल्या फिर्यादीवरुन वाशी पोलीस ठाणे येथे गुर.नं. 30372020 भादवि कलम 381 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता .
गुन्हयाची उकल सदर गुन्हयात पाहिजे असलेल्या मुलास फिर्यादी यांनी कोरोना पार्श्वभुमीचे अनुषंगाने आयोजित लॉकडाऊन मध्ये त्यांचे घरी नेले व त्यास स्वत : चे खानावळीमध्ये सहानुभुतीने आश्रयास ठेवले होते परंतु त्याचे मुळगांवाविषयी अथवा त्याचे नातेवाईकांची कोणतीही खातरजमा केलेली नव्हती अशा परिस्थितीत सदर मुलाने त्यांचे राहत्या घरी चोरी केल्याने त्याचा शोध घेणे अतिशय अवघड होते परंतु प्रस्तुत गुन्हयाचे तपासी अधिकारी सपोनि सचिन ढगे यांनी फिर्यादी व साक्षीदारांना अधिक विश्वासात घेवून त्यांच्याकडे चौकशी करून उपयुक्त माहिती प्राप्त केली व तांत्रिक तपास केल्यानंतर गुप्त बातमीदाराचे मदतीने सदर मुलास मेरीभाई चाळ , सुभाष नगर , जोगेश्वरी ( पुर्व ) मुंबई येथुन सापळा रचुन ताब्यात घेतले . तपास पथकाने त्याची अंगङ्ग डती घेतली असता त्याचे अंगझडतीत खालील नमुद वर्णनाचे चोरून नेलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम मिळून आली .
सदर बालकाचा प्रस्तुत गुन्हयात सक्रिय सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास आज दिनांक 30/09/2020 रोजी 12.16 वा . औपचारीक ताब्यात घेवून त्यास मा . बाल समिती , भिवंडी न्यायालय , जि . ठाणे यांचे समक्ष हजर करण्यात आले . हस्तगत केलेली मालपत्ता 1. 75,000 / – रु . किं . अंदाजे साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र 2. 35,000 / – रुकि अंदाजे अडिज तोळे वजनाचे सोन्याचे नेकलेस 3.35,000 / – रूकि अंदाजे अडिज तोळे वजनाचे सोन्याचे बाजुबंद 4. 30,000 / – रु . कि अंदाजे अडिज तोळे वजनाचे सोन्याचे 4 जोडीफुले 5. 25,000 / – रु . किं अंदाजे दिड तोळे वजनाचे सोन्याचा एक झुमका जोड 6. 20,000 / – रु . किं . अंदाजे पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी 7. 10,000 / – रु किं अंदाजे पाच प्रेम वजनाचा मांग टीका 8. 9,000 / – रु . किं . अंदाजे तेरा प्रेम वजनाचे चांदीचे पायातील चैन 9. 10,000 / – रु . किं अंदाजे बार प्रेम वजनाच्या चांदीच्या 2 बांगडया 10. 700 / -रु . रोख रक्कम एकुण 2,49,700 / – रु किं मुहेपाल कारवाई पथक सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त, नवी मुंबई विपीन कुमार सिंह, सह पोलीस आयुक्त डॉ . जय जाधव, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 1 , नवी मुंबई पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त वाशी विभाग , नवी मुंबई विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि संजीव धुमाळ , पोनि ( गुन्हे ) रविंद्र दॉडकर , सपोनि सचिन डगे , पोहवा 982 / गणेशकर , पोना 3154 / ठाकुर , पोना 2886 / शिरसाद पोना 2069 / म्हात्रे , पोशि अमोल भोसले यांनी अथक परिश्रम घेऊन पार पाडलेली आहे .







