नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – केंद्र सरकारने कृषी विधेयक 2020 मंजूर केले.यामुळे शेतकऱ्यांच्या हक्कावर गदा येईल. म्हणून काँग्रेस कडून त्या विधेयकाला रस्त्यारस्त्यावर विरोध केला जात आहे.त्यातच मंगळवारी दिल्ली येथे इंडिया गेट समोर केलेल्या आंदोलनात सामील झालेल्या युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांना अटक केली.त्या निषेधार्थ नवी मुंबई युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुबिन थॉमस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करणयात आले.
दिल्ली येथील इंडिया गेट येथे झालेल्या आंदोलनात युवक काँग्रेसचे महासचिव भैयाजी पवार,अब्राहाम रॉय व सचिव बंटी शेळके कणखर आंदोलन केले. त्यामुळे युवक काँग्रेसच्या तीनही पदाधिकाऱ्यांना केंद्र सरकारच्या पोलिसांनी अटक केली.हे अन्यायकारक असल्याचे आंदोलनाचे आयोजक सुबिन थॉमस यांनी सांगितले.
तसेच यावेळी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात विविध प्रकारच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला होता.या आंदोलनात नवी मुंबई युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुबिन थॉमस, प्रदेश युवक प्रवक्ता आनंद सिंग, निझामभाई शेख, सिंथीया घोडके,आरती कुमावत,जॉर्ज सेक्युयरा,आफ्रिदी शेख, सुमित सिंग, अनिष रहमानी, नशीब मकांदर, विलास साळुंखे, तस्लिम सय्यद, स्वप्नील म्हात्रे, प्रसाद कुमार, ताझीम सलीम,राजू या पदाधिकऱ्यासहित कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







