यावल तहसीलदार दालनात काँग्रेस पदाधिकाऱ्यांने केली अर्वाच्च भाषेत शिवीगाळ

yawal-tahsildar
  • टेबलवर फेकले पैसे.
  • यावल तालुक्यातील राजकीय व शासकीय वर्तुळात खळबळ
  • कारवाईची मागणी

यावल (सुरेश पाटील) – काँग्रेस पदाधिकारी पुंडलिक बारी यांनी यावल तहसीलदार यांच्या कॅबिनमध्ये अनधिकृतपणे प्रवेश करीत शिवीगाळ करून टेबलवर पैसे फेकल्याचा निंदनीय प्रकार केल्याने यावल तालुक्‍यात कार्यरत नायब तहसीलदार, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, तलाठी, लिपिक, शिपाई, कोतवाल इत्यादी कर्मचाऱ्यांनी आज काळ्या फिती लावून तीव्र निषेध व्यक्त करीत काम बंद आंदोलन पुकारले आहे.
दिनांक 30 सप्टेंबर 2020 बुधवार रोजी दुपारी यावल तहसील कार्यालयात कोविड–19 विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने तालुक्यातील अधिकारी कर्मचारी यांची एक महत्वाची आढावा बैठक सुरू असताना यावल येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी पुंडलिक बाजीराव बारी यांनी तहसीलदार यांचे दालनात अनधिकृतपणे प्रवेश करून तहसीलदार यांना अर्वाच्य भाषेत जोरजोराने बोलून शिवीगाळ केली तसेच तहसीलदार यांचे टेबलवर पैसे फेकण्याचा निंदनीय प्रकार केला. या घटनेचा निषेध व्यक्त करुन बारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणे कामी यावल तालुक्यातील सर्व महसूल अधिकारी,कर्मचारी यांनी आज दिनांक 1ऑक्टोंबर 2020 गुरुवार रोजी काळ्या फिती लावून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. yawal-tahsilपुंडलिक बारी याचे विरुद्ध गुन्हा दाखल करणे कामी आज प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले,तहसीलदार जितेंद्र कुवर,नायब तहसीलदार आर. के.पवार,नायब तहसीलदार आर.डी.पाटील, नायब तहसीलदार मुक्तार तडवी यांच्यासह मंडळ अधिकारी,तलाठी, लिपिक,शिपाई,कोतवाल इत्यादी कर्मचाऱ्यांनी यावल पोलीस स्टेशन कार्यालयात एकत्र येऊन गुन्हा दाखल करणे कामी कारवाई केली.
नायब तहसीलदार यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस स्टेशनला पुंडलिक बारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली यावल येथील पोलीस उपनिरीक्षक करीत आहेत.
या निंदनीय घटनेसंदर्भात यावल तालुक्यातील महसूल कर्मचारी जिल्हाधिकारी जळगाव, पोलीस अधीक्षक जळगाव, तसेच प्रांताधिकारी फैजपुर भाग फैजपुर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पुंडलिक बारी यांच्या विरोधात कडक कारवाई होणेसाठी तसेच बारी यांस तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here