भुसावळ तालुका पोलिसांनी गावठी पिस्तुल विकणाऱ्याला केली अटक

Bhusawal-pistol

भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) – येथील तालुका पोलिसांनी धडक कारवाई करत गावठी पिस्तुल विकणाऱ्यांला अखेर अटक केली असून, त्याला न्यायालयात हजर केले असता २ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भाग 6 गुरून 227/2020 आर्म ऍक्ट 3/25 मधील या गुन्ह्यात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना गावठी पिस्तुल विकणारा प्रमोद उर्फ प्रदीप अशोक सुरवाडे (वय 32 रा. बऱ्हाणपूर) याला काल (दि.३०) बऱ्हाणपूर येथून अटक करण्यात आली.
अटक केल्यानंतर त्याला भुसावळ न्यायालयात हजर करण्यात आले. अधिक तपासासाठी न्यायाधीशांनी त्याला २ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पो हे कॉ युनूस शेख , पो ना राजेंद्र पवार , पोलीस कॉ राहुल महाजन व उमेश बारी यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here