महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचारी यांच्या मागण्या लवकर पूर्तता होणेबाबत महाराष्ट्र राज्य व पश्चिम महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्यावतीने गृहमंत्र्यांना निवेदन

मुंबई (सिध्दार्थ जाधव) – महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचारी यांच्या मागण्या लवकर पूर्तता होणेबाबत प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य सिद्धार्थ डी. जाधव व पश्चिम महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन च्या वतीने अध्यक्ष नितीन भाऊ पाटील यांच्यातर्फे गृहमंत्री नामदार अनिल देशमुख यांना निवेदन पोलिस दलातील या विशेष मागण्या मंजूर होण्यासाठी नितीन भाऊ व त्यांचे सहकारी मित्र नेहमीच अग्रेसर व याची अंमल बजावणी होणारच असी भक्कम आशा सर्वांना आहे.
महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचारी यांच्या मागण्या लवकर पूर्तता होणेबाबत सिद्धार्थ डी जाधव प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य व पश्चिम महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन च्या वतीने अध्यक्ष नितीन भाऊ पाटील यांच्यातर्फे माननीय नामदार गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र पोलीस बाँईज असोसिएशन गेल्या अनेक वर्षापासून आपल्या पोलीस बांधवाचे अनेक प्रश्न सातत्याने मानन्याचे प्रयत्न करीत आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने व पोलीस दलामध्ये एक विशेष उत्साह निर्माण होण्यासाठी काही ठरावीक अमंलबजावणी होणे आहे ते पुढील प्रमाणे : 1 . कोल्हापुर जिल्हा पोलीस दलामध्ये पोलीस आयुक्तालय होणे अत्यंत गरजेचे आहे व गेल्या तीस वर्षापासून हा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे प्रलंबित आहे .व तो लवकरात लवकर मार्गी लागणे अत्यंत गरजेचे आहे. 2. कोल्हापूर शहरातील जुना बुधवार पोलीस लाईन, लक्ष्मीपुरी पोलीस लाईन , भगवा चौक व कसबा बावडा येथील पोलिस वसाहतीचे कामकाज व त्यातील काही तांत्रिक अडचणी दूर करून तात्काळ निधी मंजूर व्हावे. 3. महाराष्ट्र राज्यामध्ये 2013 पासून पोलीस उपनिरीक्षक परीक्षा पास झालेले पंधराशे सहाय्यक फौजदार , पोलीस हवालदार यांची सेवा जेष्ठता यादी मध्ये निवड व्हावी, तसेच पोलीस उपनिरीक्षक पदाची पदोन्नती आदेश अद्याप पारित झालेले नाही, तसेच तीन हजार ते चार हजार पोलीस उपनिरीक्षक पदे रिक्त आहेत त्या पदाची लवकरात लवकर भरतीचे आदेश काढण्यात यावे. 4. श्री साई श्रेत्र शिर्डी, पंढरपूर या धार्मिक स्थळाच्या ठिकाणी बंदोबस्त करणारे पोलीससाठी पोलिस विश्रामगृह उभारण्यात आलेला आहे. त्याच पद्धतीने कोल्हापुरात महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा मंदिर, नरसौवावाडी याठिकाणी पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था करण्यात यावी. 5. पोलीस कर्मचारी यांना वारंट बजावण्याची ड्युटी करताना शिवशाही बस मध्ये सवलत मिळावी , अशा वरील प्रमाणे मुख्य मागण्या महाराष्ट्र पोलीस बाईज असोसिएशन या संघटनेमार्फत माननीय गृहमंत्री नामदार अनिल देशमुख साहेब यांना देण्यात आले. तसेच राज्यमंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर सतेज उर्फ बंटी पाटील साहेब व ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना पण निवेदनाची प्रत देण्यात आलेली आहे . त्यावेळी त्यांच्यासोबत खासदार संजय मंडलिक आमदार चंद्रकांत जाधव आमदार ऋतुराज पाटील पोलीस महानिरीक्षक सुहास वारके साहेब जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर अभिनव देशमुख साहेब जिल्हाधिकारी माननीय दौलत देसाई साहेब साहेब हे प्रमुख उपस्थित होते. या शिस्तमंडळात योगेश हातलगे रवींद्र मोरे प्रतीक कांबळे प्रदीप गायकवाड महेश जाधव आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here