आज जिल्ह्यात ९०९ कोरोनाबाधितांची कोरोनावर मात; ३०४ जणांना कोरोनाची बाधा
जळगाव (प्रतिनिधी) – आज (दि.१) सायंकाळी कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीचा अहवाल आल्यानंतर ३०४ कोरोनाबाधित आढळून आले तर याच संख्येच्या तीनपटीने ९०९ कोरोनाबाधितांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. जळगाव शहरासह भुसावळ, अमळनेर तालुक्यात संसर्ग वाढतोच आहे.
आज आढळलेल्या ३०४ कोरोनाबाधितांमध्ये जळगाव शहर-६७, जळगाव ग्रामीण-८, भुसावळ-३०, अमळनेर-२८, चोपडा-५२, पाचोरा-६, भडगाव-२, धरणगाव-५, यावल-६, एरंडोल-८, जामनेर-२९, रावेर-९, पारोळा-२, चाळीसगाव-२९, मुक्ताईनगर-६, बोदवड-७ आणि इतर जिल्ह्यांमधील १० असा समावेश आहे.
दरम्यान, आज ९०९ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली असून, आत्तापर्यंत ४१ हजार ४५४ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. आज ६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा १ हजार १९० झाला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ५ हजार ८४० कोरोनाबाधितांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.







