जळगाव (संपादक सुनिल पाटील) – शाळेबाहेरची शाळा या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी संपूर्ण पारोळा तालुक्यात होण्याच्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी बी एस अकलाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 1/10/2020 ला सकाळी ठीक 11 वाजता झूम सभेचे आयोजन शिक्षण विभाग जिल्हा परिषद जळगाव, प्रथम फाउंडेशन व गटसाधन केंद्र पंचायत समिती पारोळा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
या सभेला गटशिक्षणाधिकारी श्रीमती कविता सुर्वे, शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार, चंद्रकांत चौधरी , गटसाधन केंद्रातील विषय साधनव्यक्ती, तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच प्रथम महाराष्ट्र संस्थेचे नाशिक विभाग प्रमुख श्री गणेश पाटील, विकास निकुंभे, संजय ठाकरे , युवराज ठाकरे, किरण वसावे, मनीषा गावित, मंगेश डगे उपस्थित होते. या सभेला पारोळा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांचे 83 मुख्याध्यापक सहभागी होते
प्रथम महाराष्ट्र संस्थेच्या वतीने “शाळेबाहेरची शाळा” ह्या उपक्रमाची संकल्पना स्पष्ट करण्यात आली. श्री गणेश पाटील यांनी या उपक्रमाची पार्श्वभूमी समजावून सांगितली. सभेचे प्रास्ताविक विजय पवार (शिक्षण विस्तार अधिकारी) यांनी केले. शिक्षकांनी काही शंका विचारल्या , त्यावर त्यांचे समाधान करण्यात आले .समारोपीय मनोगतात गटशिक्षणाधिकारी श्रीमती कविता सुर्वे यांनी मार्गदर्शन केले व सर्वांचे आभार मानले.
Home उत्तर महाराष्ट्र जळगाव शाळेबाहेरची शाळा या उपक्रमाबाबतची पारोळा तालुक्याची ऑनलाइन झूम मिटिंग संपन्न







