कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – येथील शिरोली एमआयडीसी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांचे कार्य अत्यंत कौतुकास्पद अस मनाव लागेल. कारण कोणतेही कार्य हाती घेतले तर ते पूर्ण करायचे हा त्यांचा ध्यास खरोखरच गौरवास्पद आहे. त्याच्या या कार्याला त्यांचे संपूर्ण पोलीस सहकारी मित्र व एमआयडीसी शिरोली विभागातील सर्व कारखानदार त्यांना सहकार्य करण्यासाठी नेहमीच हजर असतात.
नुकतेच त्यांच्या पोलिस ठाण्यातील पोलिस मित्राचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ताबडतोब किरण भोसले त्यांच्या सहकाऱ्यानी क्षणाचाही विचार न करता त्या कुटुंबाला मदतीचा हात दिला. हे खरोखरच प्रशंसनीय आहे. व त्यानंतर शिरोलीमधील कुरीयर कंपनीच्या एका व्यक्तीने ऑनलाईन कॅमेरा पेन बुकिंग केले होते. मात्र जेव्हा त्या इसमास ती ऑर्डर घरी आणून दिली तर ते पार्सल रिकामे आढळून आले. तात्काळ श्री.भोसले यांना फोन केल्यानंतर ताबडतोब त्या कुरिअर व्यवस्थापकांनी पैसे परत केले तसेच झालेल्या कृत्याची माफी मागितली. यामुळे त्या इसमास श्री.भोसले यांनी न्याय मिळवून दिला. या त्यांच्या कार्याबद्दल बुलंद पोलीस टाइम्सतर्फे अभिनंदन.
Home पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर शिरोली एमआयडीसी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांच्या कार्यतत्परतेला सलाम







