जळगाव (संपादक सुनिल पाटील) – मानवतेला काळीमा फासणाऱ्या उत्तर प्रदेश हाथरस येथील मनीषा वाल्मिकीच्या मृत्यूची त्रिसदस्यीय उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांकडून चौकशी व्हावी व दोषींना मृत्युदंडाची शिक्षेची मागणीसाठी सर्वपक्षीय नेते व सामाजिक कार्यकर्ते यांच्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, उत्तर प्रदेशाल हाथरस परिसीमेतील मनिषा वाल्मिकी या अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनु.जातीतील वाल्मीकी मेहतर समाजाच्या १९ वर्षीय मुलीचे अपहरण करुन सामुहीक बलात्कार करणाऱ्या क्रूर नराधमांनी तिचा मणक्याची हाडे तोडून, जीभ देखील छाटली. या प्रकरणातील आरोपी व कुटुंबियांकडून मनीषाच्या कुटुंबियांना सतत जीवे मारण्याची धमकी पूर्वीपासूनच देण्यात येत होती, त्याची तक्रारसुध्दा वाल्मिकी कुटुंबियांनी केली होती. मात्र असे असतांनासुध्दा स्थानिक पोलिसांनी दखल न घेतल्याने एका निष्पाप मुलीला तिचे प्राण गमवावे लागले आहेत.
मनीषाने पंधरा दिवस मृत्यूशी दिलेली झुंज अपयशी ठरली. घटनेच्या निषेध करून आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी याकरिता सर्वपक्षीय नेते व सामाजिक कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देऊन आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा होण्यास व फक्त बलात्कार प्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा करण्याकरिता कायद्यात दुरुस्तीची मागणी करण्यात आली.
याप्रसंगी शिवसेनेचे सरिता माळी कोल्हे, गजानन मालपुरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंगला पाटील, वाल्मिकी मामा पाटील, कम्युनिष्ट पार्टीचे जे. बी. ठाकरे, मराठा सेवा संघाचे मनोज पाटील, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र बागरे, ललित कोरोसीय, वैशाली झाल्टे, जय ढंढोरे, आनंद सोनवल, मनोज पांडे, ललित शर्मा, राजेशभाई गोयर, सुरेशभाई चांगरे, किरण राजपूत, राहुल पारचा , दिलीप सुरवाडे, सूर्यकांत पाटील, हर्षल तेजकर , लखन सांगिले यश घुसर, जयप्रकाश चांगरे, उमेश तायडे, राहुल गवळी, यश पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Home उत्तर महाराष्ट्र जळगाव हाथरस प्रकरणातील आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी; सर्वपक्षीय नेते व सामाजिक संस्थांची मागणी







