के.जी.गुजराथी मूकबधीर विद्यालयात महात्मा गांधी जयंती

dharangaon-gandhi-jayanti

धरणगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – आज (दि. २) जवाहर शिक्षण प्रसारक मंडळ धरणगाव संचलित, के.जी गुजराथी मूकबधिर विद्यालय तसेच मतिमंद निवासी अनिवासी विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 151 वी जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक वाल्मिक पाटील यांनी पुष्पहार प्रतिमेस अर्पण केले तसेच कार्यक्रमाचे मार्गदर्शन मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक ऋषिकेश जाधव यांनी केले आज शाळा तसेच शाळेचा परिसर सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी स्वच्छ केला .ह्यावेळेस राष्ट्र भजन गीतगान संतोष भडांगे यांनी केले महात्मा गांधींच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाविषयी व त्यांच्या आत्मचरित्राचे वाचन योगेश पी पाटील यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. एच.पाटील यांनी केले तर आभार अनंत जाधव यांनी केले.dharangaon-gandhi-jayanti1

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here