फैजपूर प्रांताधिकारीपदी कैलास कडलग तर यावल तहसीलदारपदी महेश पवार यांची पदस्थापना

kailas-kadluk-yawal

यावल (प्रतिनिधी सुरेश पाटील) – फैजपूर विभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांची बदली झाल्याने त्यांच्या जागेवर तळोदा जिल्हा नंदुरबार येथील सरदार सरोवर प्रकल्पाचे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले कैलास कडलग यांची पदस्थापना करण्यात आली आहे. त्यानुसार फैजपूर उपविभागीय अधिकारी म्हणून कैलास कडलग हे लवकरच आपला पदभार स्वीकारणार असल्याचे समजले.
त्याच प्रमाणे यावल तहसीलदार जितेन्‍द्र कुवर यांची बदली झाल्याने त्यांच्या जागेवर अहमदनगर येथील तहसीलदार तथा पुनर्वसन अधिकारी महेश कौतिकराव पवार हे यावल येथे तहसीलदार म्हणून पदभार स्विकारणार आहेत.
याबाबतचे आदेश महाराष्ट्र शासन उपसचिव डॉक्टर माधव गिर यांनी दिनांक 1 ऑक्टोंबर 2020 गुरुवार रोजी काढलेले आहेत. प्रांताधिकारी कैलास कडलग आणि तहसीलदार महेश पवार यांचे यावल तालुक्यातून सर्वस्तरातून स्वागत आणि अभिनंदन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here