पुणे (उपसंपादक मनीष नेरुरकर) – आज सणसवाडी येथे कोव्हिड 19 (कोरोना) पेशंटसाठी सी सी सेंटर उद्घाटन तसेच शिक्रापूर व सणसवाडी ग्रामपंचायतीच्या नविन ॲम्ब्यूलन्सचा लोकार्पण सोहळा शिरूर लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय.खासदार आदरणीयश्री.डॉ.अमोलदादा कोल्हे_साहेब तसेच शिरूर – हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोकबापू पवार यांचे हस्ते करण्यात आले.
शिक्रापूर – सणसवाडी जिल्हा परिषद गटातील कोरोना रूग्णांना त्याच परिसरात तात्काळ उपचार व्हावेत तसेच रूग्णांना इतर हाॅस्पिटलला नेण्यासाठी ॲम्ब्यूलन्स सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी शिक्रापूर- सणसवाडी जिल्हा परिषद गटाच्या कार्यक्षम सदस्या सौ कुसुमताई आबाराजे मांढरे पाटील व पंचायत समिती सभापती सौ मोनिकाताई नवनाथ हरगुडे यांनी वेळोवळी खासदार अमोल कोल्हे, कार्यसम्राट आमदार अशोकबापू पवार तसेच प्रशासनाकडे पाठपुरावा केला.
शिरूरचे प्रांतअधिकारी संतोषकुमार देशमुख, शिरूर तहसिलदार शेख व शिरूर गटविकास अधिकारी नलावडे, शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी मोरे यांनी सणसवाडी येथे तात्काळ कोव्हिड सेंटर सुरू करण्याची दखल घेवून आज कृष्णलिला मंगल कार्यालय येथे कोविड केअर सेंटर सुरू केले. तसेच सणसवाडी, शिक्रापूर ग्रामपंचायत प्रशासक जी.एल.काळे व सणसवाडी गावचे ग्रामविकास अधिकारी पवणे व ग्रामविकास अधिकारी गोरे यांनी तात्काळ दखल घेवून नविन ॲम्बूलन्स खरेदी केल्या. त्यांचाही लोकार्पण सोहळा शिरूरचे खासदार अमोल कोल्हे, शिरूर हवेलीचे आमदार अशोकबापू पवार यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना खासदार अमोल कोल्हे यांनी शिरूर हवेलीचे आमदार अशोकबापू पवार यांच्या कामाचे कौतुक केले. याप्रसंगी शिरूर तालूका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष रविबापू काळे, शिरूर काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष वैभवमामा यादव, मा. सभापती शशिकांत दसगुडे, मा. उपसभापती विश्वासकाका ढमढेरे, मा.उपसभापती अनिल भुजबळ, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजेंद्र नरवडे, उपसभापती विकास आबा शिवले, बाजार समितीचे संचालक आबाराजे मांढरे पाटील, मा. सरपंच नवनाथ हरगुडे, मा. सरपंच दत्ताभाऊ हरगुडे, मा.सरपंच पंडितआप्पा दरेकर, सरपंच रमेश सातपुते, सुभाष खैरे, गौरवदादा करंजे पाटील, निलेश थोरात, भानुदासशेठ दरेकर, गोरक्ष भूजबळ व इतर मान्यवर उपस्थित होते.







