जळगाव (संपादक सुनिल पाटील) – आज (दि.२) महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून येथील चेतना व्यसनमुक्ती केंद्रातर्फे व्यसनमुक्तीची वारी, आपल्या दारी या अनोख्या रॅलीचे आयोजन करण्यात आले.
शहरातील महात्मा गांधी उद्यानापासून आमदार राजूमामा भोळे यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. याप्रसंगी चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे नितीन विसपुते, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, मनपा उप-गटनेते तथा नगरसेवक राजेंद्र घुगे-पाटील, प्रसिध्दी प्रमुख मनोज भंडारकर, संजय विसपुते, अशोक राठी, जनमत प्रतिष्ठानचे पंकज नाले, हरीत क्रांती सेनेचे प्रवीण पाटील, डॉ. शैलजा चव्हाण, सोनू पाटील आदींसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. 







